Month: March 2026
-
एप्रिल महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील?
एप्रिल महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील? एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक खाते बंद करणे, गुड फ्रायडे, आंबेडकर जयंती आणि…
Read More » -
सिटी कनेक्ट तक्रारींचा पूर • चोहोट्टा बाजार शिबिरात अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची दांडी समाधान शिबिर की असमाधान; आ. सावरकरांनी विचारला जाब प्रतिनिधी | चोहोट्टा बाजार अकोट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत (टप्पा-१) चोहोट्टा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचा पूर आला. परंतु अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने समस्यांवर अपेक्षित तोडगा निघाला नाही. त्यामुळे त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. हे समाधान शिबिर आहे की असमाधानाचा मेळावा, असा सवाल करत ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे असल्यास बदलीचे अर्ज करुन घ्या’, असा इशारा दिला. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करण्यासाठी समाधान शिबिर घेण्यात येते. तक्रारींचे तत्काळ निवारण करत नागरिकांना डिजिटल ७/ १२, ८-अ उतारे, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र, अकृषक परवानगी आदी सेवा एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात नागरिकांची प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/ १२ मधील त्रुटी, विविध प्रमाणपत्रांची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिराला दांडी मारल्याने नागरिकांची गैरसोय वाढली. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घारेवर धरले. ‘माझ्या मतदारसंघात काम करायचे नसेल, तर बदलीचे अर्ज मतदारसंघात काम करायचे नसल्यास बदलीचे अर्ज करा आमदार सावरकर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. शिबिर पुन्हा घेणार: आ. सावरकर यांची ग्वाही शिबिरातील अव्यवस्था व प्रलंबित कामांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी हे शिबिर पुन्हा घेणार, अशी ग्वाही दिली. हे शिबिर अपेक्षेप्रमाणे झाले नाही, माहितीचा अभाव; नागरिकांपर्यंत पोहोचच नाही शिबिराबाबत प्रसिद्धी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गावपातळीवर दवंडी दिली नाही, माध्यमांना अधिकृत माहिती दिली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वेळेत कळवले नाही. यामुळे अनेक करून घ्या, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही शिबिरे घेतली जातात, अधिकारी उपस्थित नसतील तर या उपक्रमांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, शिबिरांमध्ये अधिकारी दांडी मारत असल्याने योग्य याबाबत त्यांनी शेतकरी व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. योग्य नियोजनासह हे शिबिर पुन्हा घेण्यात येईल. शिबिरात प्रत्येक अर्जावर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली, नागरिक या शिबिराबाबत अनभिज्ञ राहिले. काहींना शेवटच्या क्षणी माहिती मिळाल्याने ते आवश्यक कागदपत्रांशिवायच उपस्थित राहिले, परिणामी त्यांची कामे होऊ शकली नाही. मार्गदर्शन मिळत नाही. तसेच कामे अडकून पडतात, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. महसूल सेवेच्या सुलभतेसाठी समाधान शिबिर उपक्रम सुरू केला. परंतु चोहट्टा बाजार येथील शिबिरात प्रशासनाची कार्यक्षमता उघड नागरिकांचा आरोप, शिबिर म्हणजे दिखावा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शिबिर म्हणजे केवळ दिखावा, असा आरोप नागरिकांनी केला. अर्ज घेतले जातात, परंतु त्यावर काहीच होत नाही. गतवर्षीही असेच झाले होते. यंदाही काहीच बदल झाला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी व उपस्थितांनी दिल्या. तक्रारींवर तोडगा नाही शिबिरात शेकडो नागरिक समस्या घेऊन उपस्थित होते. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका, जमीन नोंदणीतील विसंगती, उत्पन्न व जात प्रमाणपत्रातील विलंब, पुरवठा विभागाच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी व्यथा मांडली. अनेकांनी लेखी निवेदन देण्यासाठी रांगा लावल्या. तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. शिबिरात आलो तरी तीच परिस्थिती आहे. कुणी ऐकून घेणारे नाही. मग हे शिबिर कशासाठी, असा सवाल नागरिकांनी केला. वीज प्रश्न का सुटत नाहीत? जात, उत्पन्न, रेशन व इतर प्रमाणपत्रे वेळेत का मिळत नाहीत, डिजिटल सेवा असूनही नागरिकांना फेऱ्या का, आलेल्या अजर्जापैकी किती निकाली काढले, जबाबदारांवर कारवाई होणार का आदी प्रश्नांकडे लक्ष लागले आहे
Read More » -
बॅनरवरुन अजितदादांचा फोटो हटवला, अमोल मिटकरींनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला इशारा
बॅनरवरुन अजितदादांचा फोटो हटवला, अमोल मिटकरींनी नाव न घेता सुनील तटकरेंना दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील एका कार्यक्रमातील बॅनरवर पक्षाच्या…
Read More » -
घरगुती गॅस तक्रारींसाठी अकोल्यात तक्रार निवारण कक्ष
घरगुती गॅस तक्रारींसाठी अकोल्यात तक्रार निवारण कक्ष अकोला, दि. २९ : जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी…
Read More » -
छत्रपती संभाजीनगरात चिमुकल्याच्या श्वसननलिकेत अडकला सिमेंटचा खडा, डॉक्टरांनी वाचवले प्राण
छत्रपती संभाजीनगरात चिमुकल्याच्या श्वसननलिकेत अडकला सिमेंटचा खडा, डॉक्टरांनी वाचवले प्राण छत्रपती संभाजीनगरात २ वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा…
Read More » -
कोर्टात आणताच न्यायमूर्तीनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा खरातचं एका शब्दात उत्तर
कोर्टात आणताच न्यायमूर्तीनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा खरातचं एका शब्दात उत्तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज…
Read More » -
अमरावतीत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीला ५ जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केला लैंगिक अत्याचार
अमरावतीत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीला ५ जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केला लैंगिक अत्याचार अमरावतीच्या भानखेडा शिवारात एका १८ वर्षीय तरुणीवर…
Read More » -
चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दाम्पत्याने शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
जळगावात पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि…
Read More » -
बापाने मुलाचा लोखंडी गजाने केला खून, सोलापुरातील धक्कादायक घटना
बापाने मुलाचा लोखंडी गजाने केला खून, सोलापुरातील धक्कादायक घटना रुई (ता. माढा, जि. सोलापूर) येथे बापानेच २५ वर्षीय मुलाचा…
Read More »