नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर ह्याची अकोल्यातील बेनामी संपत्ती आणि पुरावे परस्पर दुसरी कडे हलवले, वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार.
AB7
नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर ह्याची अकोल्यातील बेनामी संपत्ती आणि पुरावे परस्पर दुसरी कडे हलवले, वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार.
अकोला:- देशातील नीट पेपर फूट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर ह्याची अकोला येथील तोष्णीवाल लेआउट परिसरातील आर.सी.सी. मोटेगावकर क्लासचे साहित्य आणि रेकॉर्ड परस्पर दुसरी कडे शिफ्ट करण्यात आल्याचे विरुद्ध प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वात वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीने थेट पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.मोटेगावकर विरुद्ध सर्वोच्च तपास संस्था तपास करीत असून पेपर फूट, बेनामी संपत्ती आणि विद्यार्थी रेकॉर्ड परस्पर गायब करून आरोपीला सहकार्य करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.मोटेगावकर विरोधात विविध गुन्हे दाखल असून, कथित बेनामी संपत्ती तसेच नीट घोटाळ्याशी संबंधित बाबींचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असताना, क्लासची संपत्ती, संगणक, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदी परस्पर इतर इमारतींमध्ये हलविण्यात येत आहेत. यामुळे संभाव्य पुरावे नष्ट करण्याचा किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.तसेच मुख्य आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप त्याचे सहकाऱ्यांवर करण्यात आला असून, सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन वेळा नोटीस बजावूनही संबंधितांकडून राजरोस दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले असल्याचे दिसून आले.दरम्यान, क्लासमध्ये प्रवेशासाठी भरलेली फी परत मिळत नसल्याची तक्रार काही पालकांनी वंचित कडे केली असता . वैष्णवी पारधी आणि राधिका माहुरी यांनी कार्यालयात जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालय उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच फी परताव्याबाबतही कोणतीही स्पष्टता मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासादरम्यान पुरावे व मालमत्ता हलविण्याच्या आरोपांची पडताळणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करून करण्यात आली आहे यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधती ताई शिरसाट,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, इंजि धीरज इंगळे,जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, वंदनाताई वासनिक,दादाराव पवार, सुगत डोंगरे, आशिष रायबोले, जिया शाह, मिलिंद दामोदर, सम्राट तायडे,अक्षय राउत, जय तायडे, आकाश जंजाळ,शुभम साऊथकार,अमोल वानखडे, साहिल बोदडे, प्रदीप इंगळे, महेंद्र शिरसाट,आनंद शिरसाट,विजय पातोडे,युवराज डोंगरे,राजेश इंगळे,राजेश बोदडे,समीर पठाण, राजदार खान,धीरज इंगळे,नितीन वानखडे, ज्योती ताई खिल्लारे, किरण ताई बोराखडे,अक्षय डोंगरे, अनिकेत शिरसाठ, स्वरूप इंगोले, अंकुश बलखंडे यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————————