परशुराम गोंधळी क्रांतीदल महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिकेचे आयोजन वर-वधू चे परिचय फोटोसह पाठविण्याचे गोंधळी क्रांतीदलाचे आवाहन
Akola B7 News
परशुराम गोंधळी क्रांतीदल महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिकेचे आयोजन वर-वधू चे परिचय फोटोसह पाठविण्याचे गोंधळी क्रांतीदलाचे आवाहन
समाज संघटनेद्वारे विविध प्रकारचे सामाजभिमुक उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे संघटना मंडळे, क्रांतीदल अशा विविध संघटना समाजकल्याणाच्या विविध प्रकारचे कार्यक्रम विविध संघटना संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर परप्रांतात सुद्धा समाज संघटीत करण्याच्या दृष्टीने समाजाने, समाज बांधवांने चालविण्याचे प्रयत्न करीत आहे. सद्याच्या अतिशय धावपळीच्या गतीमान जीवनपद्धतीमध्ये आपला समाजाशी असणारा संपर्क कमी होत आहे. त्यामुळे समाजातील वधु-वरांचा विवाहाचा प्रश्न खुप महत्वाचा झाला आहे. म्हणून परशुराम गोंधळी क्रांतीदलाने गोंधळी समाजातील वधु-वर परिचय पुस्तिकेचे गोंधळी सोयरीक या नावाचे परिचय पुस्तक प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. यामध्ये आपल्या गोंधळी समाजातील नव वधु-वर, पुर्नविवाह यांचा फोटो सहित संपूर्ण परिचय पुस्तिका विनामुल्य प्रसिद्ध होणार आहे.
याकरीता आपण आपल्या समाजातील नव वधु-वरांचे फोटो सहीत परिचय पाठविण्याचे आवाहन परशुराम गोंधळी क्रांतीदलातर्फे करण्यात आले आहे. सदर पुस्तिका हि दिवाळी 2026 मध्ये प्रसिद्धी होणार आहे. या पुस्तिकेकरीता गोंधळी समाजातील विविध संघटना, मंडळे, समाजातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठीत लोकांनी व उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा परशुराम क्रांतीदलाने केले आहे.
टिप: परिचय पत्रक वडिलधाऱ्या मानसाच्या संमतीने पाठवावे, पासपोर्ट फोटो कलर पाठवावा, परिचय पत्रक हे खुल्या पाकिटामध्ये पाठवून नये. पाकिट संपूर्ण चिटकवल्याची खात्री करून घ्यावी व नंतर पाठवावे,
-: परिचय पत्र पाठविण्याचा पत्ता :-
१) अध्यक्ष -परशुराम गोंधळी क्रांती दल, सतिष वि. पवार, फ्लॅट नंबरC1-343 ता.जि. अकोला. मो. ८००७०४४९५१
२) सचिव -सुनिल वसंतराव पवार सटाना, ता. बागलान, जि. नाशिक, मो. ७७९८०५७००३
३) प्रसिद्धी प्रमुख -गौतम सुर्यवंशीगजानन महाराज मंदिर जवळ, विवेकानंद कॉलीनी, शेलु, जि. परभणी, मो. ९८८१६००८५४
4) {1}Adv ऐश्वर्या विश्वास दोर्वेकर बच्चूभाई बिल्डिंग नं 6,रूम नं 5 M.K. लेन केमेरा गल्ली बोरा बाजार फोर्ट मुंबई 400001. {2} स्वप्नील विश्वास दोर्वेकर लक्ष्मीनभागनं 5,माळा रूम नं 505 म्हाळुंगे हिंजेवाडी बाणेर पुणे 411045 {3}राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर विश्व गोंधळी परिषद 213,मंगळवार पेठ जुना बाजार चौक संगम फोटो मागे आर टी ओ रोड पुणे 4110114 विश्वास दोरवेकर मुंबई
टिप वधु-वरांची फोटो सह संपूर्ण माहिती १५ ऑक्टोंबर 2026च्या अगोदर पाठविणे बंधनकारक राहील. सदर संदेश हा जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहचविण्यात यावा.