मन की बात’ जनसंवादाचे प्रभावी माध्यम – आमदार रणधीर सावरकर* *अकोला लोकसभा मतदारसंघात 1622 बूथवर 25,722 कार्यकर्त्यांनी ऐकला ‘मन की बात’ कार्यक्रम*
AB7
‘मन की बात’ जनसंवादाचे प्रभावी माध्यम – आमदार रणधीर सावरकर*
*अकोला लोकसभा मतदारसंघात 1622 बूथवर 25,722 कार्यकर्त्यांनी ऐकला ‘मन की बात’ कार्यक्रम*
*अकोला :* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा 114 वा भाग आज उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांचा थेट जनतेशी होणारा संवाद असून देशाच्या विकासाचे, सामाजिक चळवळींचे आणि प्रेरणादायी कार्याचे दर्शन घडवणारा आरसा आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
*मान्यवरांची मनोगते:**आमदार रणधीर सावरकर म्हणाले*, _”‘मन की बात’ हा कार्यक्रम केवळ भाषण नसून तो एक वैचारिक चळवळ आहे. पंतप्रधान मोदीजी सामान्य नागरिकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना, शेतकऱ्यांच्या कष्टाला, युवकांच्या स्टार्टअपला आणि महिलांच्या कर्तृत्वाला देशपातळीवर व्यासपीठ देतात. यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना बळकट होते. अकोला जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम ऐकला, हीच खरी संघटनशक्ती आहे.”_
*खासदार अनुप धोत्रे म्हणाले*, _”पंतप्रधान मोदीजी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील गौरवास्पद कामांना प्रकाशात आणतात. आजच्या भागात त्यांनी स्वच्छता, जलसंवर्धन आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश दिला. अकोला लोकसभा मतदारसंघात 1622 बूथवर 25,722 कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कार्यक्रम पाहिला. हा सहभाग मोदीजींवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.”_
जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम चितलांगे, जयंत मसने, नकुल देशमुख, महापौर शारदा खेडकर, विजय अग्रवाल, पवन महल्ले, माधव मानकर, अॅड. अभिमन्यू नळकांडे, नगराध्यक्ष सर्वश्री हर्षद साबळे, वैशाली शेंडे, मायाताई घुले, सुलभाताई दुतोंडे, अमित कावरे, डॉ. शंकरराव वाकोडे, उमेश पवार, अॅड. देवाशिष काकड, राजेश नागमते, अंबादास उमाळे, संजय कोरडे, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश लोड, संदीप गावंडे, प्रशांत अवचार, अजय शर्मा यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
अकोला शहर, अकोट, बाळापूर, अकोला ग्रामीण, मूर्तिजापूर व रिसोड या सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर एलईडी, टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांनी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला.
*– प्रसिद्धीसाठी*
*भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्हा*