महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; बुलडाण्यात महिलेसह १५ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू
बुलढाण्यातील नांदुरा-मलकापूर रेल्वेमार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत ५८ वर्षीय लताबाई सांगळकर या महिलेसह १५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. खुमगाव बुरटी रेल्वे स्थानकाजवळ शेळ्यांना रुळावरून सुरक्षित आणण्यासाठी गेल्या असताना लताबाईना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्या मरण जागीच पावल्या तसेच रेल्वे रुळावर असलेल्या १५ शेळ्यांचाही मृत्यू झाला. या घंटेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.