ताज्या घडामोडी

राज्यात मान्सूनला अजून प्रतीक्षा; आजपासून वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन१० जूनपूर्वी मान्सून आगमनाची शक्यता कमी; विदर्भ, मराठवाडा,क्ष मध्य महाराष्ट्र व खान्देशात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

AB7

राज्यात मान्सूनला अजून प्रतीक्षा; आजपासून वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन१० जूनपूर्वी मान्सून आगमनाची शक्यता कमी; विदर्भ, मराठवाडा,क्ष मध्य महाराष्ट्र व खान्देशात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

 

अकोला: राज्यात मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून केरळ, तामिळनाडू आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणखी पुढे सरकण्याची शक्यता असली, तरी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन किमान १० जूनपर्यंत होण्याची शक्यता नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खान्देश तसेच कोकणातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व असून त्याचा मान्सूनच्या आगमनाशी कोणताही संबंध नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.रविवारी मराठवाड्यातील परभणी आणि पूर्णा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तट्टजवळा परिसरात मेघगर्जनेसह गारपिटीची नोंद झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे काही भागांत उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशाराकृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी पावसामुळे निर्माण होणाऱ्या आर्द्रतेला मान्सून समजून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. मान्सून स्थिरपणे दाखल झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, अन्यथा बियाणे व आर्थिक नुकसान होण्याचा धोका असल्याचे विभागाने म्हटले आहे.हवामान विभागाचा अंदाज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात वादळी पावसाची शक्यताकाही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाजकोकणातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता१० जूनपूर्वी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता अत्यल्पशेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावीराज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून, येत्या आठवड्यात हवामानातील बदलांवर सर्वांची नजर असणार आहे.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.