ताज्या घडामोडी

घरगुती गॅस तक्रारींसाठी अकोल्यात तक्रार निवारण कक्ष

Akola B7 News

घरगुती गॅस तक्रारींसाठी अकोल्यात तक्रार निवारण कक्ष

 

अकोला, दि. २९ : जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी तसेच गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अकोला येथील जिल्हा पुरवठा कार्यालयात “तक्रार निवारण कक्ष” स्थापन करण्यात आला असून, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी हा कक्ष कार्यरत झाला आहे. सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस संदर्भातील तक्रारींवर त्वरित कारवाई होणे आवश्यक असल्याने, नागरिकांकडून दूरध्वनीद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या कक्षामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस एजन्सींमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी. गॅस सिलेंडर संदर्भात कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास हेल्पलाईन क्र: ८०१०१५३७८० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या तक्रारींचे योग्य व जलद निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.