*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी – आमदार रणधीर सावरकर*
*अकोला जिल्हा भाजपा कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी*
*अकोला, दि. 31 मे :* भारतीय जनता पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यालयात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना *आमदार रणधीर सावरकर म्हणाले*, _”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख प्रशासनाचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांनी काशी, गया, सोमनाथ, द्वारका, रामेश्वर यांसारख्या देशभरातील तीर्थक्षेत्री मंदिरे, नर्मदा-गंगा-गोदावरीच्या काठावर घाट, धर्मशाळा आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यातून समाजसेवा, सुशासन आणि स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश मिळतो. आजच्या पिढीने त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य केले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर या न्याय, धर्म, लोककल्याण आणि सुशासनाचे प्रतीक मानल्या जातात.”_
कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा संघटन सरचिटणीस माधव मानकर, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे, भाजप ‘मन की बात’ अभियानाचे प्रमुख अॅड. अभिमन्यू नळकांडे, मूर्तिजापूर ‘मन की बात’ संयोजक विजय खिरडकर, युवा नेते उमेश पवार यांच्यासह भाजप मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
*– प्रसिद्धीसाठी*
*भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्हा*