अकोला शहरातील मुस्लिम समाजातील महत्त्वाचा सण 3 फरवरी रोजी असून शहरातील साफसफाई पथदिवे संदर्भात तसेच विशेष लाईटची व्यवस्था मुस्लिम वस्तीमध्ये करण्यात यावी असे सूचना महापौर शारदाताई खेडकर यांनी दिल्या.
AB7
अकोला शहरातील मुस्लिम समाजातील महत्त्वाचा सण 3 फरवरी रोजी असून शहरातील साफसफाई पथदिवे संदर्भात तसेच विशेष लाईटची व्यवस्था मुस्लिम वस्तीमध्ये करण्यात यावी असे सूचना महापौर शारदाताई खेडकर यांनी दिल्या.
अकोला शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सणवार तसेच उत्सव लक्षात घेता मनपा प्रशासनाने दखल घ्यावी कोणतेही भेदभाव न करता सामाजिक दायित्व म्हणून व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.
आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे विजय अग्रवाल जयंत मसने , विजय भाऊ देशमुख तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे नेते रफिक सिद्दिकी तसेच जावेद जकेरिया यांनी यासंदर्भात लक्ष देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महापौर यांनी विद्युत विभाग सफाई विभाग, यांना योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत