ताज्या घडामोडी
निवृत्त झालेल्या ६०० शिक्षकांना पुन्हा नोकरीत घेणार, बेरोजगार तरुणांकडून संताप व्यक्त
AB7
निवृत्त झालेल्या ६०० शिक्षकांना पुन्हा नोकरीत घेणार, बेरोजगार तरुणांकडून संताप व्यक्त
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या ६०० शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या शिक्षकांना ₹१५ हजार मानधनावर तात्पुरती नियुक्ती दिली जाईल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नवीन शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे शिक्षक कार्यरत राहतील. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.