बापाने मुलाचा लोखंडी गजाने केला खून, सोलापुरातील धक्कादायक घटना
रुई (ता. माढा, जि. सोलापूर) येथे बापानेच २५ वर्षीय मुलाचा निघृण खून केला आहे. शेताला पाणी देण्यावरुन झालेल्या वादातून आणि जुन्या रागातून वडील राजेंद्र पतंगे यांनी शुक्रवारी रात्री झोपेत असलेल्या विश्वजीतवर लोखंडी गजाने प्रहार केल्याने या हल्ल्यात विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाच्या आईनेच पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी आरोपी पित्याला तत्काळ अटक केली.