ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणारे व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे ग्रामीण अर्थव्यवस्था चा अभ्यास असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्याची दखल प्रदेश स्तरातील नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन ताबडतोब  सी.सी. आय. कडून कापूस हंगाम सन २०२५-२६ कापूस खरेदी योजनेला किमान एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ द्यावी, आमदार रणधीर सावरकर यांचे मागणीवरून मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. गिरीराज सिंह यांच्या कडे मागणी करून शेतकऱ्यांच्या भावना आणि आमदार सावरकर यांची समय सूचकता व शेतकऱ्या विषयी असलेली तळमळ पुन्हा सिद्ध झाली आहे.

AB7

अकोला-

शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणारे व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे ग्रामीण अर्थव्यवस्था चा अभ्यास असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्याची दखल प्रदेश स्तरातील नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन ताबडतोब

सी.सी. आय. कडून कापूस हंगाम सन २०२५-२६ कापूस खरेदी योजनेला किमान एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ द्यावी, आमदार रणधीर सावरकर यांचे मागणीवरून मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. गिरीराज सिंह यांच्या कडे मागणी करून शेतकऱ्यांच्या भावना आणि आमदार सावरकर यांची समय सूचकता व शेतकऱ्या विषयी असलेली तळमळ पुन्हा सिद्ध झाली आहे.

 

अकोला जिल्ह्यात व राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 35 लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न व एकूणच पश्चिम विदर्भात कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते या परिसरात माहे एप्रिल – मे महिन्या पर्यंत कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतो , यावर्षी राज्यात भारतीय कपास निगम लि. (सीसीआय) कडून शासन आधारभूत किंमती अंतर्गत कापूस हंगाम सन २०२५-२६ मधील उत्पादीत कापूस खरेदीसाठी सीसीआय कडून अंतिम मुदत दि. २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आलेली आहे , परंतु लांबलेला कापूस वेचणी हंगाम व प्राप्त परिस्थिती लक्षात घेता सदर खरेदी योजनेला किमान एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ देणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांच्या समस्या व ग्रामीण भागातील अडचणी समजून याबाबत आमदार रणधीर सावरकरांनी राज्याचे मुख्य मंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना केलेली मागणी लक्षात घेऊन मा. मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन केंद्र सरकारकडे कापूस खरेदी योजनेला एप्रिल अखेर पर्यंत मुदत वाढ देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. गिरीराज सिंह यांच्या कडे मागणी केली आहे, .

सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयी असलेली व ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण समस्यांची जाण असणारा नेतृत्व आमदार सावरकर यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने राज्यातील पान पानद रस्ते यास समितीमध्ये तसेच नानाजी देशमुख संजीवनी कृषी योजनेमध्ये सह अध्यक्ष म्हणून निवड केली आहे तसेच सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयी भूमिका मांडण्याचं काम आमदार सावरकर करीत असल्यामुळे त्यांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी

कापूस उत्पादिक शेतकऱ्यांकडून अद्यापही कापसाची पुर्ण विक्री करण्यात आली नसून अद्याप ही शेतकऱ्यांकडे विक्री अभावी कापूस पडून आहे. सीसीआय कडून सदर कापूस खरेदी नजिकच्या काळात बंद झाल्यास खुल्या बाजारातील कापसाचे दर प्रचंड प्रमाणात कोसळल्यास शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे ही बाब मा देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केली आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. गिरीराज सिंह यांना कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे , तसेच खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे.

शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकासन टाळण्यासाठी सीसीआय कडून शासन आधारभूत किंमतीत सुरु असलेली कापूस खरेदी प्रक्रिया किमान एप्रिल २०२६ अखेर पर्यंत सुरु ठेवण्यासाठी शासनाकडे रेटून धरल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आमदार सावरकर यांच्या कृतीचे व सुचकतेचे व शेतकऱ्या विषयी असलेली भावना असल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.