ताज्या घडामोडी
अमरावतीत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीला ५ जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केला लैंगिक अत्याचार
Akola B7 News
अमरावतीत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीला ५ जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केला लैंगिक अत्याचार
अमरावतीच्या भानखेडा शिवारात एका १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ मार्चला रात्री मित्रासोबत दुचाकीवरुन जात असताना ५ जणांनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व रोख रक्कम लुटून एकाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्परता दाखवत पाचही संशयित आरोपींना अटक केली आहे. पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.