ताज्या घडामोडी

अकोला विकसित करण्यासाठी भाजपाचाच पर्याय : चंद्रशेखर बावनकुळेमहानगरपालिका निवडणुकीत भाजपाला यश; कार्यकर्त्यांच्या बळावर विजय निश्चित

AB7

अकोला विकसित करण्यासाठी भाजपाचाच पर्याय : चंद्रशेखर बावनकुळेमहानगरपालिका निवडणुकीत भाजपाला यश; कार्यकर्त्यांच्या बळावर विजय निश्चित

 

अकोला : अकोला शहराला विकसित व समृद्ध महानगर बनविण्याच्या संकल्पासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जनता जनार्दन निश्चितपणे निवडून देईल, असा ठाम विश्वास भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तथा राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते अकोला येथील सिटी स्पोर्ट्स येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयंत म्हसने होते.नामदार बावनकुळे म्हणाले की, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची माहिती पत्रकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवावी, असे त्यांनी आवाहन केले. भाजपाच्या लोकप्रियतेमुळे व जनतेच्या विश्वासामुळे आज इतर पक्षांचे कार्यकर्तेही भाजपामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी नामदार बावनकुळे यांनी २१ सूत्री विजयाचा मंत्र देत मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले. जनता मोदी व फडणवीस सरकारच्या कामकाजावर समाधानी असून त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजपाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विविध शासकीय योजनांची माहितीही दिली. भाजपा संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी सांगितले की, भाजपा कार्यकर्ता हा ‘देवदुर्लभ’ कार्यकर्ता असून तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत राष्ट्रनिर्माणासाठी झटत असतो. या कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपा देशातील सर्वात मोठी संघटना बनली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाला मोठे यश मिळेल. प्रत्येक प्रभागात महिला व विविध समाजघटकांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 31 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून अकोला महानगरात भव्य संमेलन घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, किशोर पाटील, वैशालीताई शेळके, अर्चनाताई मसने उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर यांनी महायुतीबाबत चर्चा सुरू असून लवकरच त्याचे स्वरूप जनतेसमोर येईल, असे सांगितले. खासदार अनुप धोत्रे यांनी विजयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला डॉ. अमित कावरे, वसंत बाचूका, कृष्णा शर्मा, माधव मानकर, ॲड. देवआशिष काकड, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, आम्रपाली उपरवत, संजय जोशी, संजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा, डॉ. अभय जैन, डॉ. किशोर मालोकार, विनोद मनवानी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत म्हसने यांनी केले.निवडक २२२ कार्यकर्त्यांची विशेष बैठक या प्रसंगी घेण्यात आली असून या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.