ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचारअल्पवयीन मुलीवर अत्याचार

AB7News

अल्पवयीन मुलीवर अत्याचारअल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

 

जळगाव : कामानिमित्त जळगावातआलेल्या तरुणाने कामाच्याच ठिकाणी ओळखीचा गैरफायदा घेत १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी मध्य प्रदेशातील दमोय (जि. उमरिया) येथील एका तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी पसार झाला आहे. निमखेडी शिवारात अन्य ठिकाणचे काही कुटुंब कामानिमित्त आलेले आहेत.त्यात मध्य प्रदेशातील हा तरुणदेखील कामासाठी येथे आला. त्याची पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख झाल्याने त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने या कुटुंबातील १५ वर्षीय मुलीवर सहा महिन्यांपूर्वी अत्याचार केला. नंतरही तो तिच्यावर अत्याचार करत होता. मुलीने याविषयी घरी सांगितले आणि तालुका पोलिसात १९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली. तपास सहायक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.