प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला प्रथम क्रमांक
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील ‘कर्तव्यपथावर’ पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च बहुमान पटकावला. ‘गणेशोत्सवः आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावर आधारित या चित्ररथाने महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. आज दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.