आपला जिल्हा

अजित पवारांची औद्योगिक विकासात मोठी भूमिका – निकेश गुप्ता 

AB7

 

अजित पवारांची औद्योगिक विकासात मोठी भूमिका – निकेश गुप्ता
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्रीआणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांचे दुःखद निधन ही राज्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी असून, त्यांच्या निधनामुळे औद्योगिक विकासाचा एक दूरदृष्टी असलेला नेता आपल्यातून हरपला आहे. असे मत प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे प्रांतीय अध्यक्ष आणि विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी व्यक्त करून अजित पवार यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.राज्याच्या औद्योगिक विकासाबाबत अजित पवार यांची दूरदृष्टी होती. राज्याचे अर्थमंत्री म्हणूनत्यांनी अर्थसंकल्पात औद्योगिक विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे वरिष्ठ मार्गदर्शक आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते रमेश बंग यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली होती. संमेलनाचा प्रांतीय अध्यक्ष या नात्याने रमेश बंग यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाला अजित पवार यांनी मोठी वैचारिक प्रेरणा दिली होती, असे मत निकेश गुप्ता यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनावर व्यक्त केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.