महाराष्ट्र
केंद्रीय गृहमंत्री शाह बारामतीत दाखल, लवकरच होणार अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
केंद्रीय गृहमंत्री शाह बारामतीत दाखल, लवकरच होणार अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले आहे. दरम्यान, अजित पवारांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत पोचलेत. शाह यांना घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावर उपस्थित होते. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे देखील अंत्यसंस्कारासाठी दाखल झालेत.