ताज्या घडामोडी

30 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यासनरनाळा महोत्सवात आम्ही किल्ल्यावरून उड्या घेणारहजारो शेतकरी बांधव व लाडक्या बहिणींची आर्त हाक

AB7

30 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यासनरनाळा महोत्सवात आम्ही किल्ल्यावरून उड्या घेणारहजारो शेतकरी बांधव व लाडक्या बहिणींची आर्त हाक

 

अकोला: संपूर्ण जिल्ह्यात आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांनी ‘मानव प्रजाती वाचवा’ आंदोलन सुरू आहे. येणाऱ्या ३० जानेवारी ला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिलेला असून प्रशासन व वन्यविभाग मात्र ३० जानेवारी ला होणाऱ्या नरनाळा महोत्सवात मग्न आहे. एकीकडे ग्रामीण भागात हिंसक वन्यप्राणी नागरी वस्तीत धुमाकूळ घालत आहेत.

अकोट व तेल्हारा तालुक्याच्या ग्रामीण परिसरात हिंसक प्रवृत्ती च्या प्राण्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. रात्री शेतकरी शेतात गेले नाहीत

तर डुक्कर, हरीण, नीलगाय, रोही, शेती पिकांचे नुकसान करीत आहेत. व गेल्यास वाघ, बिबट, अस्वल शेतकऱ्यांवर हमले करीत आहेत. इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे. रात्री शेतात पिकांना पाणी देण्याकरिता एक मजूर तर त्याच्या संरक्षण करिता पाच माणसे लागत आहेत. आता मजुर मिळणे कठीण झाले असून रात्री वन्यप्राणी रहिवाशी वस्तीत येत आहेत. परंतु गंभीर विषय असून सुद्धा प्रशासनाकडे वेळ नसल्याने ग्रामीण भागात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. मुख्य प्रश्नाकडे प्रशासन व वन्यविभाग दुर्लक्ष करून नरनाळा उत्सव साजरा करीत आहे. आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर आणि वन्य विभाग व प्रशासन यांच्यात

दिनांक २९ जानेवारी पर्यंत तोडगा न निघाल्यास आम्ही नरनाळा महोत्सवात किल्ल्यावरून उड्या मारण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनात तुन देण्यात आला आहे. यावेळी सौ छाया धुळे, 3, सौ सौ माधुरी माधुरी खिरोडक खिरोडकार, सौ चंद्रकला रेळे, सौ आशा नेमाडे, सौ माधुरी बोबटकार, सौ नीता छूटे, सौ विशाखा कौठकर, सौ गोदावरी इंगळे, प्रिया देऊळकार, सौ किरण रेळे, प्रणिता मसुरकार, सौ चंचल इंगळे, दिनेश गिहें, मनीष निमकर्डे, मोहन खिरोडकार, निलेश नेमाडे, रवींद्र भोपळे, जीवन नेमाडे, रवींद्र भोपळे, अमोल मसुरकार, विनोद धुळे, अफजल भास्कर, अनिल कौठकर, गोपाल निमकर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.