महाराष्ट्र
बदलापूर स्त्री बीज प्रकरणी सरकारचा निर्णय, सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची होणार चौकशी
Akola B7
बदलापूर स्त्री बीज प्रकरणी सरकारचा निर्णय, सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची होणार चौकशी
बदलापूर येथील स्त्री बीज अवैध विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वच आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या कारभाराची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहरातील IVF केंद्रांची तपासणी केली जाणार असून अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.