ताज्या घडामोडी
रंगाचा थेंब पडला अन् आजीने ४ वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, नागपूरमधील घटना
Akola B7
रंगाचा थेंब पडला अन् आजीने ४ वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, नागपूरमधील घटना
नागपूरच्या कोराडी परिसरात होळीच्या दिवशी खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरुन एका आजीने आपल्या ४ वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम वांगे असं जखमीचं नाव आहे तर सिंधू ठाकरे असं पाणी ओतणाऱ्या आजीचं (आईची आई) नाव आहे. या घटनेत ओम गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.