आज महापौर–उपमहापौर निवडणूक अकोला महापालिकेत राजकीय हालचालींना वेगविशेष सर्वसाधारण सभेत मतदान; महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
AB7
आज महापौर–उपमहापौर निवडणूक अकोला महापालिकेत राजकीय हालचालींना वेगविशेष सर्वसाधारण सभेत मतदान; महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
अकोला : अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणूक प्रक्रियेला आज अधिकृत सुरुवात झाली आहे. शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत मतदान प्रक्रियेनंतर शहराच्या नव्या नेतृत्वाचा निर्णय होणार आहे.नामनिर्देशन प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसादमहापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांना एकूण ४६ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ठरावीक वेळेपर्यंत महापौर व उपमहापौरपदासाठी विविध पक्ष व आघाड्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.उपमहापौरपदासाठी चुरशीची लढतउपमहापौरपदासाठी एकूण चार उमेदवारांनी पाच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे.भाजपकडून अमोल सुधाकर गोगे, प्रशांत गोविंदराव जोशी व अमोल अवधूत मोहोकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून आझाद खान अलियार खान, तर अपक्ष म्हणून आशिष गणेशराव पवित्रकार यांनी दावेदारी मांडली आहे.महापौरपदासाठी तीन उमेदवार रिंगणातमहापौरपदासाठी भाजपकडून शारदा रणजित खेडकर व अॅड. कल्पना संजय गोटफोडे यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे. तसेच उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेकडून सुरेखा मंगेश काळे यांनी दोन नामनिर्देशनपत्रे सादर केली असून, एकूण तीन उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सूचक व अनुमोदक म्हणून भाजपा व शिवसेनेतील विविध नगरसेवकांची नावे अर्जांमध्ये नमूद करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी राहणार पीठासीन अधिकारीआज होणाऱ्या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहणार आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.महापालिका परिसरात कडेकोट सुरक्षामहापौर–उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली असून, संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.सत्तास्थापनेकडे अकोलेकरांचे लक्षभाजपा, शिवसेना, काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणे अधिक रंजक बनली आहेत. आजच्या मतदानानंतर अकोला शहराच्या राजकीय नेतृत्वाचा निर्णय होणार असून, त्याचे पडसाद आगामी काळात महापालिकेच्या कारभारावर उमटणार असल्याने अकोलेकरांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे