ताज्या घडामोडी
पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला
AB7News
पहाटेचा थरार! अंघोळीला निघालेल्या मनीषा खोमणे यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला
पुणे :-जिल्ह्यातील इंदापूर तालुका हादरून गेला आहे. शेळगाव (ता. इंदापूर) येथील गावठाण परिसरात मंगळवार, दिनांक 23 रोजी पहाटेच्या सुमारास एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनीषा मल्हारी खोमणे असे मृत महिलेचे नाव असून, या खून प्रकरणात तिचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.