अल्कोहोलपेक्षाही जास्त धोकादायक असतात एनर्जी ड्रिंक्स, डॉक्टरांनी दिला इशारा
डॉ. विमल कुमार राय यांच्या मते, एनर्जी ड्रिंक्स अल्कोहोल आणि सोडापेक्षा जास्त हानिकारक आहेत. त्यातील कॅफिन, साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्न किडनीची सूज वाढवतात. ही पेये एकाचवेळी निर्जलीकरण आणि रक्तातील साखर वाढवून किडनीवर अतिरिक्त दबाव टाकतात. यामुळे किडनीचे नुकसान होण्याचा धोका वाढतो आणि लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते.