अजित पवारांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्यावर साताऱ्यात करण्यात आले अंत्यसंस्कार
बुधवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. अपघातानंतर काल रात्री उशिरा त्यांच्यावर मूळगावी तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव हे मागील काही वर्षांपासून अजित पवार यांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना मानवंदना दिली.