ताज्या घडामोडी

SP-ई-संवाद” या उपक्रमाद्वारे नागरिकांना ऑनलाईन मीटिंगसाठी वेळ निश्चित करता येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना ई-मेलवर ऑनलाईन मीटिंगची लिंक पाठवली जाणार असून,

Akola B7

अकोला जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध कामांसाठी येत असतात. कुणी तक्रार घेऊन येतो, कुणी निवेदन देण्यासाठी, तर कुणी आपल्या समस्या मांडण्यासाठी तासन्तास प्रवास करून पोहोचतो. अनेकदा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना केवळ एका भेटीसाठी दिवसभर खर्च करावा लागतो. मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद करण्यात आली आहे.SP-ई-संवाद” या उपक्रमाद्वारे नागरिकांना ऑनलाईन मीटिंगसाठी वेळ निश्चित करता येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना ई-मेलवर ऑनलाईन मीटिंगची लिंक पाठवली जाणार असून, त्या माध्यमातून ते थेट पोलीस अधीक्षकांशी संवाद साधू शकतील. यामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाचणार असून, प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे.विशेष म्हणजे, या उपक्रमामागे केवळ डिजिटल सुविधा देण्याचा उद्देश नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनालाही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी कार्यालयात येण्यासाठी होणारा पेट्रोल-डिझेलचा खर्च कमी व्हावा आणि ग्रामीण भागातील लोकांनाही सहजपणे पोलीस प्रशासनाशी संपर्क साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.अकोला पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिक QR Code स्कॅन करून किंवा खालील संकेतस्थळाचा वापर करून नोंदणी करू शकतात.SP-ई-संवाद पोर्टलनोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ई-मेलवर ऑनलाईन मीटिंगची लिंक मिळणार आहे. ठरलेल्या वेळेनुसार त्या लिंकवरून थेट पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून तक्रारी, निवेदन, सूचना किंवा समस्या मांडता येणार आहेत.अकोला पोलीस दल सातत्याने आधुनिक, लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्याचा प्रयत्न करत असून, “SP-ई-संवाद” हा उपक्रम त्याचाच एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून, “पोलीस प्रशासन आता एका क्लिकवर” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची सुविधा पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.