ताज्या घडामोडी
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांचा मुंबईत एल्गार, शेतकरी नेते राजू शेट्टींसह अनेक नेते ताब्यात
Akola B7
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांचा मुंबईत एल्गार, शेतकरी नेते राजू शेट्टींसह अनेक नेते ताब्यात
आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे मोर्चा काढणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच रोखून धरले. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत व माजी मंत्री महादेव जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तुटपुंजी मदत व मुख्यमंत्र्यांकडून होणारी दुर्लक्षता यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते.