ताज्या घडामोडी
जळगाव हादरलं! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून पैसे उकळले, आरोपीला अटक
Akola B7
जळगाव हादरलं! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून पैसे उकळले, आरोपीला अटक
जळगावमधील चाळीसगाव येथे यश महेंद्र जैन या तरुणाने एका तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सात लाखांची वसुली केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या मोबाईल तपासणीत इतर अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. आरोपीला कोर्टात हजर केले असून हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.