ताज्या घडामोडी

आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा .

Akola B7

आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा .

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी मोठा निर्णय, शिवराज सिंह चौहान यांनी खरेदीची मर्यादा ८.१९ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवली

अकोला जिल्ह्यातील हरभरा खरेदीच्या लक्षांक संपुष्टात आल्यामुळे शेतकऱ्यांची हरभरा खरेदी ठप्प झाली होती त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठी हरभरा खरेदी लक्षांक वाढवून देण्यात यावा याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पणन मंत्री जयकुमार रावल यांना विनंती केली होती सदर विनंतीनुसार मुख्यमंत्री महोदय यांनी कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या सोबत चर्चा करून संपूर्ण राज्याकरिता हरभरा खरेदीचा लक्षांक वाढवून घेण्यासाठी कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले होते खासदार अनुप धोत्रे यांनी सुद्धा दिल्ली येथे मा. क्रुषि मंत्री यांच्या कडे मागणी रेटून धरली होती, सदर आश्वासनाची पूर्तता होऊन हरभरा खरेदी करता केंद्र शासनाने मोठा निर्णय घेऊन लक्षांकात वाढ केली आहे आता महाराष्ट्रात रब्बी २०२५-२६ हंगामासाठी हरभऱ्याच्या खरेदीची कमाल मर्यादा ८१९,८८२ मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

*त्यामुळे महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे*

महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रब्बी २०२५-२६ हंगामात राज्यात पीएसएस (PSS) अंतर्गत हरभऱ्याच्या कमाल खरेदीचे प्रमाण ८,१९,८८२ मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीचे एकूण एमएसपी मूल्य ₹४,८१६.८० कोटींहून अधिक असेल. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील हरभरा खरेदीची अंतिम मुदत ३० दिवसांनी वाढवून २९ मे २०२६ करण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत आपल्या उत्पादनाची विक्री पूर्ण करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. आता, अधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा (MSP) लाभ घेता येईल आणि बाजारातील दबावामुळे त्यांना कमी दरात विक्री करावी लागणार नाही.

*शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता*

महाराष्ट्रातील हरभरा खरेदीबाबतचा हा निर्णय, शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्याबाबत सरकारची संवेदनशीलता आणि सक्रिय दृष्टिकोन दर्शवतात. या निर्णयामुळे संबंधित राज्यांतील शेतकऱ्यांना केवळ थेट आर्थिक लाभच मिळणार नाही, तर कृषी क्षेत्रातील विश्वास, सुरक्षितता आणि स्थिरतेचे वातावरणही अधिक दृढ होईल. किफायतशीर भाव सुनिश्चित करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल, शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता अधिक दृढ करते.असे आमदार रणधीर सावरकरांनी स्पष्ट केले आहे,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.