ताज्या घडामोडी

भाजप-एनडीएचा विविध राज्यांत दमदार विजय; अकोल्यात जल्लोषात उत्सव पश्चिम बंगाल, आसाम, पाँडिचेरीसह महाराष्ट्रात यश; कार्यकर्त्यांनी आतिषबाजी व पेढे वाटून साजरा केला आनंद

AB7

भाजप-एनडीएचा विविध राज्यांत दमदार विजय; अकोल्यात जल्लोषात उत्सव पश्चिम बंगाल, आसाम, पाँडिचेरीसह महाराष्ट्रात यश; कार्यकर्त्यांनी आतिषबाजी व पेढे वाटून साजरा केला आनंद

अकोला, : देशातील विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व एनडीएला मिळालेल्या यशानंतर अकोल्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम बंगाल, आसाम व पाँडिचेरीसह महाराष्ट्रातही पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला.जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह परिसर तसेच भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आतिषबाजी, ढोल-नगारे वाजवत आणि पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला.या वेळी आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद साजरा केला.नेतृत्वावर विश्वासाचा कौलआमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने विविध राज्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत सकारात्मक कौल दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळया विजयामागे कार्यकर्त्यांची मेहनत, संघटनात्मक बळ व जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी हा निकाल कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.