देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम आता सुनेत्रा पवारांच्या नावावर
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजय मिळवत नवा इतिहास रचला. देशाच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील हे सर्वाधिक मताधिक्य ठरले. त्यांनी अजित पवारांचा २०१९ मधील १ लाख ६५ हजार २६५ मतांचा विक्रम मोडीत काढला. २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपच्या २ नेत्यांनी अजित पवारांचा हा विक्रम मोडला होता, तो रेकॉर्ड आता सुनेत्रा पवारांनी आपल्या नावावर केला आहे.