ताज्या घडामोडी

एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घालाजळगाव जिल्ह्यात अपघात; अकोल्यातील तिघे ठार

Akola B7 News

एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घालाजळगाव जिल्ह्यात अपघात; अकोल्यातील तिघे ठार

जळगाव : जिल्ह्यात बुधवार अपघातवार ठरून दोन अपघातांत पाच जण ठार, तर आठ जण जखमी झाले. यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर माहेरी परतणारी नववधू व ८ मे रोजी लग्न असल्याने वणी गडावर लग्नाची पत्रिका ठेवून गाती परतत असलेल्या वाग्दत्त वधू मुलीसह पाच जण ठार झाले. वराड (ता.धरणगाव) व महादेव बांबरूड(ता.पाचोरा) येथे हे अपघात झाले.बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास वराइजतळ (ता. धरणगाव) चाक निखळून वाहन समोरील टँकरवर धडकले. त्यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्या ओवाळणीला माहेरी परतणारी नववधू पूजा रवी वाघळकर (२२), तिचे काका जगदीश चंद्रभान वाघळकर (५२) व मामा दत्तू तुळशीराम भागवत (५२, सर्वपूजा वाघळकर शिखा बेलसरे रा.महाकालीनगर, अकोला) हे ठार झाले, तसेच नववधूचे वडील रती प्रभाकर वाघळकर, चुलतभाऊ प्रेम भारत वाघळकर (२४), मेहुणे नितेश कडोळे (३५), अमोल गीते (३५), आजोबा तुळशीराम भागवत (६७), भाचा अंश नितेश कडोळे (१४) हे जखमी झाले.गडावर लग्नपत्रिका ठेवून परतताना टायर फुटलादुसरा अपघात पाचोरा तालुक्यातील महादेव बांबरुडजवळ झाला. कारचे टायर फुटून ती झाडावर धडकली. त्यात वणी गडावर लग्नपत्रिका ठेवून गावी परतणारी वाग्दत्त वधू शिखा विनायक बेलसरे (२७) आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मीना सुनील मानकर (४५, दोन्ही रा. काशीकर कॉलनी, परतवाड़ा, जि. अमरावती) या दोन्ही ठार झाल्या, तसेच शिखाचा भाऊ शुभम बेलसरे, मीना मानकर यांचे पती सुनील जखमी झाले आहेत. शिखा हिचे ८ मे रोजी लग्न होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.