धाराशिवमध्ये फोटो काढून ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम अटकेत
धाराशिवमधील तुळजापुरात स्नॅपचॅटवरून मैत्री करून आणि लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपी साहिल शेख याने गुंगीचे औषध देऊन पीडितेचे फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावर दोन वर्षे अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत