ताज्या घडामोडी
बारामती पोटनिवडणूकः रोहित पवारांनी टाळलं; पण सुप्रिया सुळे थेट महायुतीच्या व्यासपीठावर
AB7
बारामती पोटनिवडणूकः रोहित पवारांनी टाळलं; पण सुप्रिया सुळे थेट महायुतीच्या व्यासपीठावर
बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या व्यासपीठावर उपस्थित राहून सर्वांना चकित केले. सुनेत्रा पवारांनी फोन करताच सुळे थेट व्यासपीठावरच आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याआधी, आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांचा ३ दिवस प्रचार केला, पण महायुतीच्या व्यासपीठावर जाणार नाही अशी भूमिका घेत सांगता सभेला येणार नसल्याचे सांगितले.