चाळीसगावात चुलत काकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओ केले व्हायरल
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात नात्याने चुलत काका आणि भावाच्या मित्राने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीचे पीडितेच्या घरी सतत येणं-जाणं होतं, आरोपीने मुलीला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.