जवाहर नगर येथे घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा नियमित सुरू करण्यात यावी -महापौर यांना देण्यात आले निवेदन
AB7
जवाहर नगर येथे घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा नियमित सुरू करण्यात यावी
-महापौर यांना देण्यात आले निवेदन
अकोला:-जवाहर नगर येथे घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा नियमित सुरू करण्यात यावी यासाठी मनपाचे
महापौर यांना श्रीमती आशा श्रीकांत पिसे पाटील यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा जवाहर नगर येथे नियमित सुरू होती.परंतु गेल्या महिनाभरापासून कचरा गाडी येत नसल्याने कचरा साचला आहे.त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे दुर्गंधीचा वास सुरू आहे त्यामुळे माशा मच्छरानी हैदोस घातला आहे यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आमच्या परीसरात घंटा गाडी सेवा तात्काळ सुरू करण्यात यावे.
सेवा नियमित व वेळेवर सुरू करण्यात यावी.संबधीत विभागावर योग्य देखरेख ठेवावी .
——————————