ताज्या घडामोडी
भाऊबंदकीतील जमीन वाटणीसाठी तहसीलदारांची परवानगी रद्द; ₹५०० होणार नोंदणी: मंत्री बावनकुळे
AB7
भाऊबंदकीतील जमीन वाटणीसाठी तहसीलदारांची परवानगी रद्द; ₹५०० होणार नोंदणी: मंत्री बावनकुळे
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भाऊबंदकीतील जमिनीच्या हिस्सेवाटणीसाठी तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीची अट रद्द केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले की, भाऊ-बहिणींमधील आपसी जमीन वाटणी आता थेट मुद्रांक कार्यालयात केवळ ₹५०० शुल्कात नोंदणी करता येईल. सोमवारपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे शेतकरी कुटुंबांचा वेळ वाचून कायदेशीर प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे