रेशनवर साडी मिळणार!
अकोला : गतवर्षीप्रमाणेच यंदाही शासनाने अंत्योदय रेशन कार्डधारक म्हणजे गरीब कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला रेशन दुकानांमार्फत याचे वितरण होणार आहे. लग्नसराईच्या काळात या लाभामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.