ताज्या घडामोडी
भोंदू राजेंद्र गडगे याचा ‘दत्तधाम दरबार’ सील; पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
AB7
भोंदू राजेंद्र गडगे याचा ‘दत्तधाम दरबार’ सील; पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
वडगावपान (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’ चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर सील केला असून तब्बल ४ तास झाडाझडती घेतली. या कारवाई दरम्यान दरबारात स्पॉट पंचनामा करण्यात आला. तसेच विविध औषधांचे नमुनेही पोलिसांनी ताब्यात घेतले. अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या गडगेला कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.