ताज्या घडामोडी

अकोला शिवणी विमानतळाचे”श्री संत गजानन महाराज विमानतळ” नामकरण करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांची मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी,

AB7

अकोला शिवणी विमानतळाचे”श्री संत गजानन महाराज विमानतळ” नामकरण करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांची मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी, केंद्र शासनाला आवश्यक शिफारस करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव, विमान चालन यांना मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश…,

अकोला महाराष्ट्र शासनानेशासनाने अकोला विमानतळाचे भुसंपादनाकरीता २०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने, अकोला येथील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीत असून अल्पावधीत सदरचे विमानतळ लोकसेवेत रुजू होणार आहे. आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोले कर ची मागणीची पूर्तता केली पुन्हा

अकोला…..शहरानजिक शेगाव, जि. बुलढाणा येथे श्री संत गजानन महाराजांचे पावन वास्तव्य असल्याने शेगाव नगरीला विदर्भाची पंढरी असे संबोधले जावून या ठिकाणी लाखो भाविक-भक्त व वारकरी श्री संत गजानन महाराजांच्या आशिर्वाद व दर्शनासाठी येत असतात. शेगाव येथे येण्याकरीता मध्य रेल्वेची तसेच महामार्गाची व्यवस्था आहे. परंतु देश आणि परदेशातून येणा-या श्रद्धाळू भाविकांना संत नगरी शेगाव येथे येण्याकरीता कोणतीही हवाई वाहतूक उपलब्ध नाही. त्या कारणाने अकोला शहरातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणाचे काम तातडीने करण्याकरीता आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी शासनास विनंती आहे. तसेच आमदार व खासदारद्वयांनी अकोला येथील शिवणी विमानतळाचे *श्री संत गजानन महाराज विमानतळ* असे नामकरण करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने निर्णय व्हावा व सदर नामकरण करण्याकरीता केंद्र शासनाला शिफारस करण्यास विनंती केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ,यांना ,सचीव यांना निर्देश दिले. प्रस्ताव सादर करून लवकरचम मंत्री मंडळाची मान्यता प्राप्त होऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे त्यामुळे विदर्भातील पंढरी व संत गजानन महाराज संत परंपरा संस्कृतीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी स यांनी आमदार सावरकर यांच्या मागणीची पूर्तता केली आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.