महाराष्ट्र तापला, अकोला ४२°C; आगामी चार आठवडे राज्याची होरपळ
उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे वाहू लागले असून, त्यांचा विपरीत परिणाम म्हणून अवघा महाराष्ट्र तापला आहे. पुढील आठवडाभर संपूर्ण राज्याची होरपळ होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील चार आठवडे अधिक उष्णतेचे असतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. अकोल्याचे शनिवारचे (दि. ११) कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.