क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील मातृ शक्ती सुरक्षित राहील संस्कारी राहील शिक्षित राहील तर हा समाज राष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार केला श्रद्धे सोबत मानवता चा विचार अंगीकार करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि आज त्यांच्या द्विशताब्दी वर्ष साजरा
Akola B7
अकोला….क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील मातृ शक्ती सुरक्षित राहील संस्कारी राहील शिक्षित राहील तर हा समाज राष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी स्त्री शिक्षण व अनिरुष्ट रूढींचा विरोध करून मानवता धर्माचा प्रचार प्रसार केला श्रद्धे सोबत मानवता चा विचार अंगीकार करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य पुढे नेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि आज त्यांच्या द्विशताब्दी वर्ष साजरा करण्याचा सौभाग्य मिळाला हा आनंददायी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते. खासदार अनुप धोत्रे , विजय अग्रवाल जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर राजेश बेले, डॉक्टर शंकरराव वाकोडे, संजय कोरडे, उमेश जाधव गणेश लोड, मनीष गावंडे भरत चराटे, डॉक्टर अमित कावरे, प्रवीण पाटील हगवणे, रामदास लांडे, गणेश राव तायडे, विवेक भरणे ,अंबादास उमाळे, राजू उगले, शिवलाल इंगळे, माधव मानकर, छायाताई मानकर, गजानन उंबरकार, मिलिंद राऊत, संदीप गावंडे एडवोकेट कल्पना गोटफोडे, राजू वारू कार , पवन महल्ले , करण शाहू, अजय शर्मा सतीश ढगे, नितीन ताकवले प्रशांत अवचार अण्णा उबाळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
दि शताब्दी वर्षानिमित्त महायुती सरकारने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम होणार असून कार्यकर्त्यांनी या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
यावेळी संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन, एडवोकेट देवाशिष काकड तर प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.