ताज्या घडामोडी

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण स्वराज्य कृतीने करून दिशा दाखवली होती देश स्वतंत्र काळात महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा या संदर्भात दिशादर्शक मार्गदर्शन केले

Akola B7

अकोला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण स्वराज्य कृतीने करून दिशा दाखवली होती देश स्वतंत्र काळात महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा या संदर्भात दिशादर्शक मार्गदर्शन केले होते परंतु काँग्रेसने या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था हळूहळू कमी होऊन शहरी करणाचा विस्तार झाला ग्रामीण जनता शहरात आल्या याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्मता मानवतावाद मानणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुशासन रिकामाला गती देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू असून एका छताखाली ग्रामीण भागातील जनतेला वेळेची बचत आर्थिक बचत सोबत सुविधा व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर आयोजन करण्याची परंपरा सुरू ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामीण पांदण रस्ते शेतकऱ्याला मदत अनेक उपक्रम या महायुती सरकारने सुरू केले आहे त्यामुळे ग्रामीण व शेतकरी मध्यमवर्गीय कामगार यांना काम केंद्रबिंदू मानून कार्यरत असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.श्री छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबीर पळसो मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिबिरामध्ये महसुलातील १५ सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात आला.

पळसो बडे, या पंचकोशीतील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन तातडीने निकाली काढण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. यावेळी आमदार सावरकर यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा आवाहन करून अधिकाऱ्यांना जनता यांच्या समस्या जाणून घेऊन पीडित वंचित नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले

 

*यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शरद जावळे उपविभागीय अधिकारी, कुणाल झाल्टे तहसीलदार अकोला*,

*नायब तहसीलदार संतोष शिंदे संजय गांधी विभाग*

*विश्वजीत लिंगायत,निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग*

*शेख अन्सारोद्दीन,मंडळ अधिकारी धनश्री पाटकर, गणेश मोरे, नरेंद्र वानखडे, भारती, इंगळे एडी घोगरे, आर ए मसने आधी प्रामुख्याने होते.

यावेळी ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.