नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न
नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण व त्यांच्यावर विशिष्ट धर्माची संस्कृती लादण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. टीम लीडर्सकडून ८ तरुणींचा ‘ब्रेनवॉश’ करुन त्यांना जाळ्यात ओढले जात होते. याप्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून ६ संशयितांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे.