ताज्या घडामोडी
मुंबईत देवीच्या यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर BMC ने फिरवला बुलडोझर
Akola B7
मुंबईत देवीच्या यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर BMC ने फिरवला बुलडोझर
मुंबईच्या दिंडोशीतील संतोषनगर भागात मरियम्मा देवीच्या यात्रेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांच्या अनधिकृत साम्राज्यावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या हिंसाचारातील मुख्य आरोपींनी अमली पदार्थांच्या तस्करीतून उभी केलेली बेकायदेशीर बांधकामे मुंबई महापालिकेने (BMC) बुलडोझर फिरवून जमीनदोस्त केली. ५ एप्रिलला भजन वाजवण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर दंगलीत झाले होते. याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक केलीय.