मुंबई विमानतळावर भीषण आग, तासाभरापासून सर्व गेट बंद
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वरील रनवे परिसरात आज संध्याकाळी भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. खबरदारी म्हणून विमानतळाचे सर्व गेट्स तासाभरापासून बंद करुन उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.