स्वयंपाक घरात येऊन झोपला बिबट्या, सिंधुदुर्गातील थरारक घटना
दाभोली (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथे एका घराच्या स्वयंपाकघरात बिबट्या शिरुन चक्क गाढ झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बुधवारी सकाळी विवेक जोशी यांच्या घरात बिबट्या झोपलेला दिसून आला. माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने जाळीचा वापर करुन या २ वर्षीय मादी बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद केले. वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.