जागतिक नवकार महामंत्र दिनानिमित्त नवकार महामंत्राचा सामुहिक जप
अकोला – येथील जीतो महिला विंग आणि युथ विंगच्या वतीने जागतिक नवकार महामंत्र दिनानिमित्त सामुहिक नवकार महामंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व शांती आणि विश्व कल्याणाच्या कामनेसाठी दरवर्षी ९ एप्रिल रोजी जगभरात नवकार महामंत्राचा जप करण्यात येतो. येथील बाविशी भगवान आयोजित या सामुहिक नवकार महामंत्र जपासाठी वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष कनकभाई शाह यांचेसह मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होत्या.आ. रणधीर सावरकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी जीतो महिला विंगच्या अध्यक्ष अलका खटोड यांचे हस्ते नवकार महामंत्राचे चिन्ह आ. रणधीर सावरकर यांना भेट देण्यात आले. जगातील १०० देशांतील २००० ठिकाणी नवकार महामंत्र जपाचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते. दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित मुख्य कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. त्यांचे लाईव्ह संबोधन यावेळी उपस्थितांना ऐकविण्यात आले. ना. अमित शाह यांनी समाजाची एकता, संस्कार आणि धर्माचे महत्त्व विशद केले. येथील कार्यक्रमाचे संचालन हिना शाह यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका खटोड,कोमल जैन, निर्मला खटोड,प्रिया संकलेचा, निशा सेठी, संजना बिलाला, कुशल जैन, सिध्दार्थ खटोड,कौशल संकलेचा, हार्दिक वोरा यांनी परिश्रम घेतले