निवासी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग सक्षमीकरण बाबत बैठक संपन्न*सरकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आमदार सावरकर
Akola B7 News
निवासी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग सक्षमीकरण बाबत बैठक संपन्न*सरकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आमदार सावरकर
अकोला जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा सुरळीत लाभ मिळावा यासाठी युडीआयडी कार्ड, आधार कार्डशी लिंक करण्याबाबत आधार कार्ड व यु.डी. आय. डी. कार्ड धारकांच्या हितासाठी प्राध्यानाने कारवाई करण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी * *दिल्या. सरकारी योजनेचा लाभापासून एकही दिव्यांग वंचित राहता कामा नये अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित दिव्यांग सक्षमीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.*
*यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,सहायक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण डॉ.तुषार जाधव, तहसीलदार (सं.गा.योजना) गौरी धायगुडे, अधीक्षक शाम धनमने, विविध* *विभागांचे अधिकारी व दिव्यांगसेवा प्रतिनिधी शाम राऊत आदी उपस्थित होते.*
*आमदार रणधीर सावरकर म्हणाले की,*
*दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना तथा नव्याने सुरू करण्यात आलेले दिव्यांग सहायक* *पोर्टल,युडीआयडीकार्ड आधारशी लिंक करणे. दिव्यांग नोंदणी प्रक्रिया हि सेतू केंद्रामार्फत राबविणे,तालुका व ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात यावा.तालुकानिहाय* *दिव्यांग बोर्ड मार्फत दिव्यांग तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. युडीआयडी कार्ड प्राप्त होण्यासाठी लागणारा विलंब कमी* *करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा*,
*ज्यांनी यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केले आहे आणि ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र कायमस्वरूपी* *आहे,अशा लाभार्थ्यांना अनुदान सुरू राहणार असून तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांनी पुनर तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.*
*दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनेतील लाभ घेण्यासाठी शासनाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरु केले आहे. कोणताही* *लाभार्थी हक्काच्या लाभा पासुन वंचित राहु नये व लाभ जलद गतीने मिळण्यासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालयाने पोर्टलला सर्व योजनेचे अर्ज जोडले आहेत.* *लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड, तथा दिव्यांग प्रमाणपत्र असने आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्याकडे* *यूडीआयडी व प्रमाणपत्र आहे.अश्या लाभार्थ्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी करुन घ्यावे. असे आवाहन डॉ.* *तुषार जाधव सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग अकोला यांनी केले आमदार सावरकर यांनी अकोट येथील दिव्यांग बोर्ड तात्काळ सुरु करावे हि तातडीची मागणी यावेळी केली*
.*अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे झालेल्या* *बैठकी *मध्ये .ना.मंत्री अतुल सावे यांच्या सोबत संवाद साधून अकोट येथील दिव्यांग बोर्ड सुरु करावे. या* *बाबत चर्चा केली. त्यावर मंत्री सावे तेव्हाच अकोट बोर्ड सुरु करण्यासाठी तात्काळ* *पत्र काढून सदर मंजुरी मिळणे साठी केंद्र सरकार कडे मागणी केली.
आणि केंद्र सरकारने सुद्धा तातडीने दखल घेऊन अकोट येथील केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी दिव्यांग संघटनेच्या समस्या सुद्धा जाणून घेऊन त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्याच्या तसेच संघटनेने सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन योजनेचा लाभ घ्यावा अशी आव्हान आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
आमदार रणधीर सावरकर यांची सक्रियता पुन्हा सिद्ध झाली आहे.
अकोला महानगर सह शहरातील दिव्यांग पेट्रोल गॅस उपभोक्ता*, आरोग्य तसेच वेगवेगळ्या क्षेत्राच्या समस्या निराकारणासोबत सातत्याने संघटना व जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून विकास कामांना गती देण्याचं काम आमदार रणधीर सावरकर सतत 18 तास जनतेच्या सेवेत उपलब्ध राहून संघटना जनता शासकीय यंत्रणा यांना सक्रिय करून त्यांच्या अडीअडचणी राज्य शासन आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करून .लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी कर्तव्य पूर्तता सातत्याने करीत आहे.