ताज्या घडामोडी

अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव कोणत्या एरियामध्ये आहे त्याचा नंबर अनुक्रमांक नंबर बुथ क्रमांक घर क्रमांक संपूर्ण माहिती व्हावी यासाठी विशेष कक्ष चा शुभारंभ

Akola B7 News

अकोला… एस आर एस आर आय संदर्भात भारतीय जनता पक्षाने मतदार राजा यांना सुविधा होऊ नये यासाठी 2000 2004 व 2024 मधील अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव कोणत्या एरियामध्ये आहे त्याचा नंबर अनुक्रमांक नंबर बुथ क्रमांक घर क्रमांक संपूर्ण माहिती व्हावी यासाठी विशेष कक्ष चा शुभारंभ भाजपा नेते आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने संतोष शिवरकर यांच्या उपस्थितीमध्ये आरंभ करण्यात आला आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजता पर्यंत पाच जणांची टीम अकोले करांच्या सेवेत रजू झाल्याची माहिती भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली.

अकोले करांचे व लोकशाहीतील महत्त्वाचा मतदार राजाचा हक्क कायम राहावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांनी आपल्या आपल्या त्या भागातील प्रमुख कार्यकर्ते बूथ प्रमुख यांच्याकडे यादी दिल्या आणि नागरिकांना अजून सुविधा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यालय आळशी संकुल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन थेटर समोर भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालयात अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 2004 व 2024 ची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदाराला एका मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी पाच जणांची टीम उभी करण्यात आली असून यासाठी संजय गोटफोडे, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, अंबादास उमाळे, मनीष गावंडे, पवन महल्ले , वैशालीताई शेळके चंदाताई शर्मा, अजय शर्मा, सागर शेगोकार, दिलीप मिश्रा, सतीश ढगे, तुषार भिरड, प्रशांत अवचार, संदीप गावंडे नितीन ताकवाले ,गोपाल मुळे, राजेश वगारे, एडवोकेट नितीन गवळी, सुनील कांबळे अमोल गीते यांच्या नेतृत्वाखाली टीम उभी करण्यात आली असून ग्रामीण आणि शहरी भागांसाठी मतदारांना उपयोगी पडणाऱ्या व एका क्लिकमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची ही अभिनव व मतदारांचा हक्क अभी राहण्यासाठी या अभियानामध्ये व्यवस्था भारतीय जनता पार्टी कार्यालयात करण्यात आली याचा लाभ नागरिकांनी घ्यावा अशी विनंती राजेश नागमते आम्रपाली उपरवट एडवोकेट रूपाली काकडे, निकिता देशमुख, चंदाताई ठाकूर, संतोष पांडे यांनी केली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.